Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"आंदोलन करणार नाही अशी कोणत्याच बॉण्डवर सही केली नाही; पुन्हा रस्त्यावर उतरणार!"; अभिजीत दिपके यांचा थेट इशारा

"आंदोलन करणार नाही अशी कोणत्याच बॉण्डवर सही केली नाही; पुन्हा रस्त्यावर उतरणार!"; अभिजीत दिपके यांचा थेट इशारा

नवी दिल्ली : खरा पंचनामा 

दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटका झाल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी आंदोलनाबाबत सुरू असलेल्या चर्चावर महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. "आम्ही यापुढे आंदोलन करणार नाही अशा कोणत्याही अटीवर किंवा बॉण्डवर स्वाक्षरी केलेली नाही; आम्ही पुन्हा पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरू," असा ठाम इशारा दिपके यांनी दिला आहे.
१० ऑक्टोबर रोजी दिल्ली विमानतळावरून ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना दिल्ली कॅन्ट येथील विशेष कार्यकारी दंडाधिकारी (SEM) न्यायालयात हजर केले होते. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जामीन मुचलक्यावर (Bail Bond) त्यांची सुटका करण्यात आली. सुटकेनंतर आजीचे निधन झाल्यामुळे अंत्यदर्शनासाठी दिपके तातडीने छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या गावी परतले. दरम्यान, पोलिसांनी वर्षभराचा शांतता करार करून घेतल्याने ते आता आंदोलन करणार नाहीत, अशी चर्चा सुरू झाली होती.

या चर्चा फेटाळून लावत दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर (ट्विटर) पोस्ट करत म्हटले, "आंदोलन करणार नाही अशा कोणत्याही बॉण्डवर आम्ही सही केलेली नाही. आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरणार आहोत." दुसरीकडे, सीजेपीच्या नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. "आता खऱ्या अर्थाने आमची लढाई सुरू झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आम्ही कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही," असा आक्रमक पवित्रा पक्षाने घेतला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.