ज्ञानेश कुमार यांचा विषय शांत झालेला नसताना निवडणूक आयोगाचा अजून एक अधिकारी सापडला वादात
नवी दिल्ली : खरा पंचनामा
निवडणूक आयोगातील मतभेद समोर आल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. हा वाद अजून शांत झालेला नसतानाच आता निवडणूक आयोगातील अजून एका अधिकाऱ्याच्या कामकाजावरुन वाद समोर आलय.
जुलै महिन्यात सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी या दोन निवडणूक आयुक्तांनी कॅबिनेट सचिव टीवी सोमनाथ यांना वेगवेगळी पत्र लिहिली व वरिष्ठ उप निवडणूक आयुक्त मनीष गर्ग यांच्या एका निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. हिंदुस्तान टाइम्सने या संबंधी वृत्त दिलं होतं.
हा निर्णय निवडणूक आयोगाच्या आयटी महासंचालक सीमा खन्ना यांच्या फाईल्सच्या समीक्षेशी संबंधित आहे. मनीष गर्ग यांनी एक आदेश काढला व डीजी आयटीच्या फाईल्स उपनिवडणूक आयुक्त संजय कुमार यांच्याकडे पाठवण्याची व्यवस्था बंद केली. दोन्ही निवडणूक आयुक्तांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, “संजय कुमार एक अनुभवी अधिकारी आहेत. त्यांन निवडणूक प्रक्रियेची चांगली समज आहे. अशावेळी आयटी विभागाच्या कारभारावर लक्ष ठेवण्यापासून त्यांना दूर ठेवणं हे नियमांचं उल्लंघन आहे"
वाद वाढल्यानंतर मागच्या आठवड्यात निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण जारी केलं. हा विषय धोरणात्मक वाद किंवा आयटी विभागाच्या कामकाजाशी संबंधित नाहीय. आयोगात प्रतिनियुक्तीवर तैनात एका अधिकाऱ्याच्या आचरणाशी संबंधित होता. आयोगानुसार मनीष गर्ग यांचा आदेश कधी पूर्णपणे लागू झाला नाही. आयटी विभागाच्या उपनिवडणूक आयुक्तावर लक्ष ठेवण्याचं काम चालूच राहिलं.
मनीष गर्ग यांनी आदेशावर काय स्पष्टीकरण दिलं ?
ऑगस्ट महिन्यात संजय कुमार आपल्या कॅडरवर परत आले. ते गेल्यानंतर त्यांची जबाबदारी आता मनीष गर्ग संभाळत आहेत. मनीष गर्ग यांच्या माध्यमातून डीजी आयटीच्या फाईल्स निवडणूक आयुक्तांपर्यंत पोहोचत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, मनीष गर्ग यांनी दोन्ही निवडणूक आयुक्तांना भेटून आपली बाजू मांडली. हा निर्णय पदक्रमाशी संबंधित होता. कारण डीजी आयटी सीमा खन्ना यांना अलीकडेच प्रमोट करण्यात आलेलं. त्या उप निवडणूक आयुक्त संजय कुमार यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी होत्या.
कॅबिनेट सचिव टी.वी. सोमनाथ यांनी दोन्ही निवडणूक आयुक्तांच्या तक्रारी कार्मिक एवं प्रशिक्षण विभागाला (DoPT) पाठवल्या. सरकारचं म्हणणं आहे की, या प्रकरणात थेट कारवाई करणं हे निवडणूक आयोगाच्या स्वायत्तेत हस्तक्षेप करण्यासारखं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.