Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अभिजीत दिपके अन् त्यांचे सहकारी कुठे आहेत? मोठी माहिती आली समोर, तिघांनांही थोड्याच वेळात...

अभिजीत दिपके अन् त्यांचे सहकारी कुठे आहेत? मोठी माहिती आली समोर, तिघांनांही थोड्याच वेळात...

नवी दिल्ली : खरा पंचनामा 

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांत्यासह सहसंयोजक सौरव दास आणि आशुतोष रांका हे सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहेत. तिघांनाही खबरदारीचा उपाय म्हणून ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना आज कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात येणार आहे.

मात्र, तिघांनाही औपचारिकरीत्या अटक केलं नसल्याचं दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांवर फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (CrPC) कलम 107 आणि 151 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली कॅन्ट पोलीस ठाण्यातील कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर त्यांना हजर केले जाणार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांना एखाद्या व्यक्तीकडून दखलपात्र गुन्हा घडण्याची किंवा सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता वाटल्यास प्रतिबंधात्मक कारवाई करता येते. अशा वेळी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाते. त्यानंतर शांतता राखण्यासाठी हमीपत्र भरून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीची सुटका होऊ शकते.

दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीचे संघटन प्रभारी अजिंक्य शिंदे यांनी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या स्थितीबाबत माहिती मागितली होती. शनिवारी सकाळी मुंबईहून दिल्लीला पोहोचल्यानंतर विमानातूनच दिल्ली पोलिसांनी तिघांना ताब्यात घेण्यात आलं होतं.

ताब्यात घेतल्यानंतर १२ तास उलटूनही तिघांच्या कुटुंबीयांना कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप पक्षाने केला होता. तसेच त्यांच्या वकिलांनाही माहिती देण्यास नकार दिल्याचे पक्षाचे म्हणणे होते.

तिघांना नेमके कुठे ठेवण्यात आले आहे, त्यांना एकत्र ठेवले आहे की वेगवेगळ्या ठिकाणी, तसेच कोणत्या यंत्रणेने त्यांना ताब्यात घेतले आहे, असे प्रश्नही सीजेपीने उपस्थित केले होते. अशातच आता दिल्ली पोलिसांनी तिघांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्याची तयारी सुरू केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.