Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाराष्ट्रात पुन्हा धोधो कोसळणार; 'या' जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा

महाराष्ट्रात पुन्हा धोधो कोसळणार; 'या' जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा

मुंबई : खरा पंचनामा 

राज्यात मान्सूनची माघार झाल्यानंतर उष्णतेत वाढ झाली असतानाच आता पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरसह काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. काही भागांसाठी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून उष्ण आणि कोरडे वातावरण आहे. मात्र, हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यातील काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः घाट परिसरात पावसाची शक्यता असून, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांदरम्यान नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोल्हापूर आणि घाट परिसरात सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर जिल्हा आणि घाट परिसरातही वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष ठेवावे.

सातारा जिल्हा आणि घाट परिसरात तसेच सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

उष्णतेचा सामना करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहावे. पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचा जोर सर्वत्र सारखा असेलच असे नाही; त्यामुळे स्थानिक हवामानाचा अंदाज तपासणे महत्त्वाचे आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.