Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगली ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; रेकॉर्डवरील गुन्हेगार विनायक पुजारी सांगली जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार

सांगली ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; रेकॉर्डवरील गुन्हेगार विनायक पुजारी सांगली जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार विनायक दत्तात्रय पुजारी (वय ३९ वर्षे, रा. रामनगर समडोळी, ता. मिरज, जि. सांगली) याच्यावर कडक कारवाई करत त्याला सांगली जिल्ह्याच्या हद्दीतून एका वर्षाच्या कालावधीसाठी हद्दपार करण्यात आले आहे. संशयिताविरुद्ध शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे तसेच अमली पदार्थांशी संबंधित गुन्हे दाखल असून तो पुन्हा गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय झाल्याने पोलीस प्रशासनाने ही कारवाई केली आहे.

सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये विनायक पुजारी याला हद्दपार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग यांच्याकडे पाठवला होता. या प्रस्तावावर रीतसर सुनावणी घेऊन मिरज उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी विशाल यादव यांनी विनायक पुजारी याला सांगली जिल्ह्याच्या स्थळसीमा हद्दीतून एका वर्षाकरिता हद्दपार करण्याचा आदेश पारित केला आहे.

पोलीस प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अरुण औताडे, साहाय्यक पोलीस फौजदार मेघराज रुपनर, पोलीस अंमलदार बंडू पवार आणि अभिजित पाटील यांच्या पथकाने पूर्ण केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.