Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, सूरत कनेक्शन; क्राईम ब्रांचच्या हाती मोठा पुरावा

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, सूरत कनेक्शन; क्राईम ब्रांचच्या हाती मोठा पुरावा 



मुंबई : खरा पंचनामा 

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचला मोठं यश मिळालं आहे. या हाय-प्रोफाईल प्रकरणाचा तपास वेगाने पुढे नेत पोलिसांनी गुजरातच्या सूरत शहरातून दोन शस्त्र आणि १० जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. याच शस्त्रांचा वापर अभिनेत्याच्या कारवर गोळीबार करण्यासाठी करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याबाबत मुंबई क्राईम ब्रांचकडून अधिकृत दुजोरा मिळणं अद्याप बाकी आहे. 

शुक्रवारी मुंबई क्राईम ब्रांचच्या पथकांनी या प्रकरणाच्या संदर्भात एका ठिकाणावर छापा टाकला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांची चौकशी केल्यानंतर आणि त्यांच्या शस्त्र पुरवठ्याची सप्लाय चेन तपासल्यानंतर एकामागून एक कड्या जुळत गेल्या, ज्यामुळे पोलीस गुजरातच्या सूरतपर्यंत पोहोचले. सूरतमधून मिळालेली ही शस्त्र आणि काडतुसं आता फॉरेन्सिक तपास आणि बॅलिस्टिक टेस्टसाठी पाठवण्यात आली आहेत. 

१८ ऑक्टोबरच्या संध्याकाळची ही संपूर्ण घटना आहे. जेव्हा मुंबईतील जुहूमध्ये टायगर श्रॉफच्या कारला टार्गेट करण्यात आलं होतं. दोन हल्लेखोरांनी अचानक अभिनेत्याच्या गाडीवर गोळीबार केला आणि नंतर पसार झाले. या हल्ल्यात टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला, परंतु त्याचा ड्रायव्हर आणि एक जण गोळीबारात जखमी झाले होते. मीडियावर एक पोस्ट शेअर करून अनिल पंडितनेच टायगर श्रॉफवर झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. 

सुरक्षा यंत्रणांच्या मते, पंडित हा गँगस्टर लॉरेंस बिश्नोई गँगचा अत्यंत जवळचा असून अमेरिकेतून बसून आपले गुन्हेगारी रॅकेट चालवत आहे. सध्या पोलीस या संपूर्ण सिंडिकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी पुढील तपास करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.