Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षची आज निवड नाहीच, महायुतीचे सर्व संचालक सभेसाठी अखेर गैरहजर, सभा तहकूब

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षची आज निवड नाहीच, महायुतीचे सर्व संचालक सभेसाठी अखेर गैरहजर, सभा तहकूब 



कोल्हापूर : खरा पंचनामा 

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाचा पेच निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरम अभावी गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक अडचणीत सापडणार का, अशी चर्चा रंगली होती. आज (29 ऑक्टोबर) कोरम अभावी सभा तहकूब होणार असल्याने गोकुळच्या दूध संघाच्या अध्यक्षांची निवडणूक होऊ शकली नाही. 

राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीकडून अध्यक्षपदासाठी निवडणुकीपूर्वीच गोकुळचे संस्थापक स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार अध्यक्ष निवडीसाठी बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीकडे महायुतीच्या संचालकांनी दांडी मारल्यामुळे अर्ज भरण्याची मुदत संपल्याने आज अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकली नाही. दुसरीकडे जर सलग तीन बैठकांमध्ये जर संचालक अनुपस्थित राहिले, तर त्यांचे संचालक पद रद्द होऊ शकतं. त्यामुळे आता पुढील दोन बैठकांमध्ये तरी अध्यक्ष निवडले जातात का, याकडे लक्ष असेल. 

बहुमत असूनही अध्यक्ष निवड होत नसल्याने राजर्षी शाहू आघाडीकडून न्यायालयीन मार्ग स्वीकारला जाणार का, याकडे सुद्धा लक्ष असेल. न्यायालयीन मार्गांची चाचपणी करण्यासाठी अजिंक्यतारावर वकील सुद्धा पोहचले होते. त्यामुळे पुढील काही दिवसात सतेज पाटील यांच्याकडून यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महायुतीकडून सुद्धा सत्ता मिळवण्यासाठी मागील दाराने प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र ते न्यायालयीन पातळीवरती टिकणार का, हा सुद्धा सर्वात मोठा प्रश्न असेल. स्वीकृत संचालक वाढवून त्यांना मतदानाचा अधिकार देऊन सत्ता काबीज करता येते का, यासाठी महायुतीने प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र हा निर्णय न्यायालयीन पातळीवर टिकणारा नसल्याने ही सुद्धा हालचाल थांबल्याची चर्चा आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.