Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ट्रक पलटी होताच महिला-लहान मुलांनी दारूचे बॉक्स पळवले, पोलिस येण्याआधी रिकामी केली दारू

ट्रक पलटी होताच महिला-लहान मुलांनी दारूचे बॉक्स पळवले, पोलिस येण्याआधी रिकामी केली दारू

पाटणा : खरा पंचनामा 

बिहारमध्ये दारूबंदी लागू असतानाही भररस्त्यात दारूच्या बाटल्यांची लूट झाल्याची घटना समोर आली आहे. बिहारच्या अररिया जिल्ह्यात दारूने भरलेला एक मिनी ट्रक अपघातग्रस्त झाल्यानंतर घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले.

यावेळी नागरिकांनी ट्रकमधील दारूच्या बाटल्या आणि दारूचे संपूर्ण बॉक्स पळवले. या घटनेत महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दारूची वाहतूक करणाऱ्यांसह ट्रकचा मालक आणि चालकाचा शोध सुरू केला आहे.

बिहारमध्ये 2016 पासून दारूबंदी कायदा लागू आहे. या कायद्यानुसार राज्यात दारूचे सेवन, विक्री आणि वाहतूक करण्यास बंदी आहे. मात्र दारूबंदी असलेल्या याच बिहारमध्ये भररस्त्यात दारूच्या बाटल्यांची लूट झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बिहारच्या अररिया जिल्ह्यातील खरहट टोल प्लाझाजवळ शुक्रवारी ही घटना घडली. दारूने भरलेला मिनी ट्रक रस्त्याच्या दुभाजकाला धडकून अपघातग्रस्त झाला. त्यानंतर ट्रकमधील दारूच्या बाटल्या पळवण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली.

आसाम राज्यातील नोंदणी क्रमांक असलेला एक मिनी ट्रक दारूची वाहतूक करत असताना खरहट टोल प्लाझाजवळ रस्त्याच्या दुभाजकाला धडकला. या अपघातात ट्रकचे नुकसान झाले. अपघातानंतर ट्रकचा चालक आणि क्लीनर घटनास्थळावरून पसार झाले. सुरुवातीला हा एक सामान्य रस्ते अपघात असल्याचे दिसत होते. मात्र अपघातग्रस्त ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात दारू असल्याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी जमली.

ट्रकमध्ये दारू असल्याचे समजताच अनेकांनी ट्रकमधून दारूच्या बाटल्या बाहेर काढण्यास सुरुवात केली. पाहता पाहता घटनास्थळी दारूच्या बाटल्या पळवण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली. काही नागरिकांनी एक-दोन बाटल्या नेण्याऐवजी दारूचे संपूर्ण बॉक्सच उचलून नेले. विशेष म्हणजे या लुटीत महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता.

या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये अनेक नागरिक अपघातग्रस्त मिनी ट्रकमधून दारूच्या बाटल्या काढून नेताना दिसत आहेत. काही जण दारूच्या बाटल्या हातात घेऊन घटनास्थळावरून जात असल्याचे तर काही जण दारूचे संपूर्ण बॉक्स घेऊन जात असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे दारूच्या बाटल्या पळवणाऱ्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याचे या व्हिडीओतून दिसून येते.

सुरुवातीला पोलिसांना ही एक सामान्य रस्ते अपघाताची घटना वाटली होती. मात्र अपघातग्रस्त वाहनात दारू असल्याची माहिती परिसरात पसरल्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यानंतर नागरिकांनी ट्रकमधील दारूच्या बाटल्या पळवण्यास सुरुवात केली.

दरम्यान सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली. त्यानंतर अतिरिक्त पोलीस दल घटनास्थळी पाठवण्यात आले. मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत बहुतांश दारू तेथून पळवण्यात आली होती. त्यामुळे दारूच्या बाटल्या घेऊन गेलेल्या नागरिकांची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.