Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापूरचं राजकारण बंटी पाटलांना विचारुन करायचं; 'गोकुळ' जिंकताच विश्वजीत कदमांचा आणखी एक डायलॉग

कोल्हापूरचं राजकारण बंटी पाटलांना विचारुन करायचं; 'गोकुळ' जिंकताच विश्वजीत कदमांचा आणखी एक डायलॉग 



कोल्हापूर : खरा पंचनामा 

राज्याचं लक्ष लागलेल्या कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत यंदा महायुती विरुद्ध माजी मंत्री तथा काँग्रेस नेते सतेज बंटी पाटील यांच्यात थेट सामन रंगला होता. खासदार धनंजय महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह दिग्गजांची मादियाळी भाजपा महायुतीकडून (Mahayuti) मैदानात उतरली होती. त्यामुळे, गोकुळच्या 25 पैकी 25 जागांवर आपला विजय होईल, असा विश्वास महायुतीच्या नेत्यांना होता. मात्र, बंटी पाटलांनी (Satej Patil) येथे आपली शिट्टी वाजवली असून काँग्रेसप्रणित राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने 16-9 असा विजय मिळवल्याचे आमदार विश्वजीत कदम यांनी म्हटलं आहे. 

गोकुळच्या निवडणुकीतील विजयानंतर बंटी पाटलांचं राज्यभरातून अभिनंदन केलं जात आहे. तर, काही दिवसांपूर्वी पुण्यातील आंदोलनात बोलताना, आमदार विश्वजीत यांनी भाषणामुळे व्हायरल झालेल्या विवेकानंद पाटीलला उद्देशून केलेलं वाक्यही आज चांगलंच चर्चेत आलं आहे. कोल्हापूरचं राजकारण बंटी पाटलाला विचारुन करायचं... असे विश्वजीत कदम यांनी म्हटलं होतं. आता, गोकुळच्या निवडणुकीनंतर विश्वजीत कदम यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तर, विश्वजीत कदम यांनीही ट्विट करत बंटी पाटलांचे अभिनंदन केले. मात्र, यावेळी त्यांनी दुसराच डायलॉग वापरला आहे. अभिनंदन बंटीदादा, मानलं राव तुम्हाला. शेवटी काय, तो कंडका पाडलाच !.. असे म्हणत विश्वजीत कदम यांनी कोल्हापुरातील या निवडणुकीच्या विजयानंतर प्रतिक्रिया दिली. तसेच, आमदार रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 

गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीत 'खटक्यावर बोट जाग्यावर पलटी' केल्याबद्दल 'समविचारी आघाडी' पॅनलचे प्रमुख नेते सतेज पाटील आणि माझे मित्र ऋतुराज पाटील यांचं व त्यांच्या संपूर्ण टीमंचं मनःपूर्वक अभिनंदन. एकदा ठरलं की 'कंडका पाडल्याशिवाय' सोडायचं नाही, हेच कोल्हापूरकरांनी या निवडणुकीत दाखवून दिलं. आता, या संस्थेत दूधासारखा शुभ्र सभासदांच्या हिताचाच कारभार होईल आणि दूध उत्पादकांना पुन्हा चांगले दिवस येतील, असा विश्वास असल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं. तसेच, असाच निकाल पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातही लागेल, त्यासाठी पैसा आणि सत्तेच्या बळावर कितीही अडथळे आणले गेले तरी संघर्ष सुरुच ठेवा, असाच संदेश या निकालाने दिल्याचेही रोहित पवार म्हणाले. 

दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला असून दोन बड्या नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांचाही पराभव झाला आहे. विशेष म्हणजे, मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद आणि भाजपा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा तथा माजी संचालिका शौमिका महाडिक यांचाही पराभव झाला आहे. शौमिका महाडिक यांचा 120 मतांनी पराभव झाल्याने हा महाडिक कुटुंबास मोठा धक्का मानला जातो.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.