Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

इम्रान खानला देश सोडण्याची नोटीस, OCI कार्डधारकाला भारतात आंदोलन करता येतं का?

इम्रान खानला देश सोडण्याची नोटीस, OCI कार्डधारकाला भारतात आंदोलन करता येतं का?

दिल्ली : खरा पंचनामा 

बॉलिवूड अभिनेता इम्रान खान याला 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या राजकीय आंदोलनात सहभागी झाल्याने भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्याच्याविरोधात तक्रार केली होती. इम्रान खान हा भारतीय नागरिक नसून ओसीआय (OCI) कार्डधारक आहे. त्यामुळे त्याच्या आंदोलनातील सहभागावरून कायदेशीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पण एखाद्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी भारतीय नागरिक असणं बंधनकारक आहे का? परदेशी नागरिकाने सरकारविरोधी आंदोलनात सहभाग घेतला, तर त्याला थेट देश सोडण्यास सांगता येतं का? ओसीआय कार्डधारकांना नेमके कोणते अधिकार मिळतात आणि कोणत्या परिस्थितीत त्यांच्यावर कारवाई होऊ शकते? इम्रान खानच्या प्रकरणाच्या निमित्ताने हे प्रश्न समजून घेणं महत्त्वाचं आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं. या आंदोलनात अभिनेता इम्रान खानही सहभागी झाला होता. त्याच्या सहभागाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली. इम्रान खान भारतीय नागरिक नसताना आंदोलनात सहभागी कसा झाला. त्याच्या या कतीमळे ओसीआयविषयक नियमांचं किंवा व्हिसाच्या अटींचं उल्लंघन झालं आहे का, असे प्रश्न उपस्थित करत सोमय्या यांनी त्याला ताब्यात घेण्याची आणि भारतातून हद्दपार करण्याची मागणी केली होती. या प्रकरणात इम्रान खानला 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावण्यात आल्याचं वृत्त आहे. मात्र, या नोटिशीमागील नेमकी कायदेशीर तरतूद आणि कारवाईची अधिकृत कारणं स्पष्ट होणं आवश्यक आहे. कारण, एखाद्याविरोधात तक्रार दाखल होणं, त्याला नोटीस बजावणं आणि त्याच्यावरील आरोप सिद्ध होणं या तीन वेगवेगळ्या बाबी आहेत.

OCI कार्ड म्हणजे भारतीय नागरिकत्व नव्हे

ओसीआय अर्थात Overseas Citizen of India ही योजना 2005 मध्ये सुरू करण्यात आली. भारतीय वंशाच्या पात्र परदेशी नागरिकांना या योजनेअंतर्गत काही विशेष सुविधा दिल्या जातात. ओसीआय कार्डधारकांना भारतात अनेकदा प्रवेश करण्यासाठी आजीवन, बहुप्रवेश व्हिसासारखी सुविधा मिळते. शिक्षण, मालमत्ता आणि काही व्यावसायिक बाबींमध्येही त्यांना ठराविक सवलती मिळतात. मात्र, नावात 'सिटिझन' असलं, तरी ओसीआय कार्ड म्हणजे भारतीय नागरिकत्व नाही. ओसीआय कार्डधारक हे कायद्याच्या दृष्टीने परदेशी नागरिकच असतात. त्यामुळे त्यांना भारतात मतदान करता येत नाही. लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढवण्यासारखे राजकीय अधिकारही मिळत नाहीत. ओसीआय कार्डधारकांचे अधिकार आणि त्यांच्यावर लागू होणारे निर्बंध हे नागरिकत्व कायदा, 1955 आणि केंद्र सरकारच्या संबंधित नियमांनुसार ठरतात. त्यामुळे भारतीय नागरिकांना मिळणारे सर्व अधिकार ओसीआय कार्डधारकांनाही मिळतात, असा समज करून घेता येत नाही.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.