Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

उजनीवरील एआय डेटा सेंटरच्या विरोधात 1 खासदार, 4 आमदार 3 माजी मंत्री, 1 माजी आमदार उतरले रस्त्यावर

उजनीवरील एआय डेटा सेंटरच्या विरोधात 1 खासदार, 4 आमदार 3 माजी मंत्री, 1 माजी आमदार उतरले रस्त्यावर



सोलापूर : खरा पंचनामा 

उजनी धरण परिसरातील प्रस्तावित एआय डेटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन, तरंगता सौरप्रकल्प, स्मॉल मॉड्यूलर रिऍक्टर प्रकल्पांच्या विरोधात माढा तालुक्यातील रांजणी येथे पुणे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात एक खासदार, चार आमदार, दोन माजी मंत्री, एक माजी आमदार आणि हजारो नागरिक सहभागी झाले होते. पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असलेला हा डेटा सेंटर कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असा इशारा या नेत्यांनी दिला.

खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली उजनी धरण परिसरातील प्रस्तावित प्रकल्पाच्या विरोधात सोलापूर-पुणे महामार्ग रांजणी येथे रोखून धरण्यात आला. या आंदोलनात आमदार अभिजीत पाटील, आमदार नारायण पाटील, नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, महादेव जानकर, माजी आमदार संजयमामा शिंदे, शिवसेना नेते संजय कोकाटे, शेकाप नेते डॉ. अनिकेत देशमुख, दिग्विजय बागल, साविताराजे भोसले सहभागी झाले होते.

शिवसेना नेते, आमदार बच्चू कडू यांनी फोनवरून संवाद साधून आंदोलनाला पाठिंबा दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हा प्रकल्प रद्द करण्यासंदर्भात बोलणार असून असे धोकादायक प्रकल्प महाराष्ट्रात नको, अशी भूमिका मांडली.

आंदोलनात १० हजारांहून अधिक शेतकरी, महिला व मच्छिमार सहभागी झाले होते. आंदोलनामुळे १५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली होती.

खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, आम्ही विकासाला विरोध करतोय, असं तुम्हाला वाटत असेल तर डेटा सेंटरचे सर्व प्रकल्प गुजरातमध्ये न्या. विनाशकारी गुंतवणूक आम्हाला नकोच. उजनी धरण प्रकल्पावर अवलंबून असणाऱ्या योजना अद्यापही अपूर्ण आहेत. त्याला केंद्र आणि राज्य सरकारने निधी द्यावा. मात्र, उजनीवर होणारे प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत आम्ही होऊ देणार नाही.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.