मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील कमाल तापमान अजूनही 33 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. त्यामुळे सकाळी थंड वातावरण, तर दुपारी उष्णता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्यातील किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सकाळच्या थंडीत वाढ होऊ शकते.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात हवामानात मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. मध्य बंगालच्या उपसागरात उद्या चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या हवामान बदलांवर हवामान विभाग लक्ष ठेवून आहे.
राज्यातील काही भागांमध्ये किमान तापमानात मोठी घट नोंदवण्यात आली आहे.
धुळे येथे 10.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
परभणी कृषी केंद्रात 10.5 अंश, निफाडमध्ये 11.5 अंश आणि जेऊर येथे 12 अंश तापमान नोंदवण्यात आले. याशिवाय गोंदिया येथे 12.6 अंश, तर यवतमाळमध्ये 12.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. एकूणच, राज्यात थंडीची सुरुवात झाली असली तरी दुपारचे तापमान जास्त असल्याने नागरिकांना संमिश्र हवामानाचा अनुभव येत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
