पुणे : खरा पंचनामा
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा थेट दिल्लीमध्ये होत आहेत. या चर्चाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शहा रविवार आणि सोमवार (ता. 15-16) पुणे दौऱ्यावर आहेत. यातच राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य नेते छगन भुजबळ यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठा गौप्यस्फोट केला आहे.
शरद पवार, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित माझ्यासमोर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर तब्बल 40 ते 45 मिनिटे चर्चा झाली होती, असा दावा छगन भुजबळ यांनी केला.
छगन भुजबळ म्हणाले, "अजितदादा असताना, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा गांभीर्याने सुरू होती. माझ्यावरील शस्त्रक्रियेनंतर अजितदादा भेटायला आले होते. जयंत पाटील देखील होते. यावेळी चर्चेदरम्यान, दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावे, अशी भूमिका मांडली होती.
अजितदादा चांगले नेतृत्व करत आहेत."
या चर्चेदरम्यान, जयंत पाटील यांनी तुम्ही एनडीएसोबत आहात, याकडे लक्ष वेधले होते. हे त्यांना मान्य होईल का? यावर पक्षाचे कार्याध्यक्ष अजितदादा आहेत, तर संस्थापक शरद पवार आहेत. हे दोघे निर्णय घेतील, असे भूमिका आपण मांडल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले. यानंतर मात्र पुढे काहीच घडले नाही, असेही छगन भुजबळ यांनी म्हटले.
आता पुन्हा विलीनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. प्रत्येक जण वेगवेगळे मते मांडून, त्याचा वेगळाच अर्थ निघत आहे. आता यावर सांघिकपद्धतीने चर्चा व्हावी. एक प्रकारे क्रिकेटचा खेळ सुरू असल्यासारखी परिस्थिती आहे. एकत्र बसून निर्णय झाल्यास, त्याचे परिणाम चांगले होतील.
आम्हाला समाज माध्यमांतून, किंवा बातम्यांच्या माध्यमातून समजते, असेही छगन भुजबळ यांनी म्हटले.
विलीनीकरणाच्या निर्णय आमच्या पक्षाच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेतील. पण ते सर्वांना विचारून, सर्वांचे मत लक्षात घेऊन, सांघिक पद्धतीने घेतली, अशी अपेक्षा छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. सुनेत्रा पवार हा सर्व निर्णय सर्वांना विश्वासातच घेऊन घेतील आणि तो योग्य देखील ठरले, असेही ते म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
