Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई: कोट्यवधी रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त

ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई: कोट्यवधी रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त

ठाणे : खरा पंचनामा 

दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध आणि बनावट मद्य विक्रीविरोधात मोठी धडक कारवाई हाती घेतली आहे. सणासुदीच्या काळात मद्याची वाढती मागणी लक्षात घेऊन आंतरराज्य तस्करी व बनावट मद्याचे वितरण रोखण्यासाठी प्रशासनाने विविध ठिकाणी छापे टाकून कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून अनेक आरोपींना अटक केली आहे.

ऑक्टोबर २०२६ मध्ये बनावट मद्य, परराज्यातील कर चुकवलेले मद्य आणि बनावट विदेशी स्कॉचविरोधात एकूण ७ गुन्हे दाखल करण्यात आले असून १० आरोपींना अटक करण्यात आली आहे, तसेच सुमारे ८५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांत या कारवाईत प्रचंड वाढ झाली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीत तब्बल ६.३५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, मागील वर्षांच्या तुलनेत यंदा जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये मोठी वाढ झाली आहे.

सणासुदीच्या काळात ग्राहकांची फसवणूक होऊ नये आणि आरोग्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून उत्पादन शुल्क विभागाने भरारी पथके तैनात केली असून अवैध व्यवसायांवर कसून तपासणी केली जात आहे. प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी कोणत्याही संशयास्पद किंवा अनधिकृत ठिकाणाहून स्वस्त दरात मिळणारे मद्य खरेदी करू नये, कारण ते विषारी किंवा कमी दर्जाचे असण्याची दाट शक्यता असते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.