अहिल्यानगर : खरा पंचनामा
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या बिनविरोध निवडीला सहकार न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेतील त्यांचे विरोधी उमेदवार एकनाथ चंद्रभान घोगरे यांनी ही निवडणूक याचिका दाखल केली आहे.
सुजय विखे पाटील, निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक प्राधिकरण आणि सहकार विभागाचे विभागीय सहनिबंधक यांना सोमवारी (ता.16) म्हणणे सादर करण्याचा आदेश न्यायालयाने काढला आहे.
घोगरे यांचे वकील सुरेश लगड यांनी या माहितीला दुजोरा दिला.
भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांची बिनविरोध निवड झाली. त्यांचे विरोधी उमेदवार एकनाथ घोगरे यांनी सुजय विखे पाटील यांच्या बिनविरोध निवडीवर आक्षेप घेतला आहे. राहुरीतील बाबुराव तनपुरे सहकारी कारखान्याचे थकबाकीदार संचालक असल्याचा त्यांचा दावा आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाने बँकेकडून वैयक्तिक हमीवर कर्ज घेऊन ते थकवले आहे.
त्यानुसार ते सहकार कायद्यातील तरतुदींनुसार थकबाकीदार ठरतात. त्यांचा अर्ज नामंजूर करावा, अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली होती.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोगरे यांचा हा आक्षेप फेटाळून लावला. यावर घोगरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालयाने ती याचिका निकाली काढताना, उच्च न्यायालयाने सहकार न्यायालयात दाद मागणे संयुक्त ठरेल, असे निरीक्षण नोंदवले.
एकनाथ घोगरे यांनी यावर सहकार न्यायालयात याचिका दाखल केली. सुजय विखे पाटील कारखान्याचे संचालक थकबाकीदार असल्याचा दावा करत, त्यांना सहकार कायद्यानुसार अपात्र ठरवावे, अशी याचिका घोगरे यांनी सहकार न्यायालयात दाखल केली आहे.
निर्णय निवडणूक अधिकाऱ्यांनी सुजय विखे पाटील यांना बिनविरोध करण्याचा निर्णय रद्द ठरवावा, अशी मागणी देखील या याचिकेत केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
