Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर भाजपचा 'गेम प्लॅन' तयार ? लोकसभेतील ३६० खासदारांचं गणित कसं जुळणार, पाहा समीकरण

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर भाजपचा 'गेम प्लॅन' तयार ? लोकसभेतील ३६० खासदारांचं गणित कसं जुळणार, पाहा समीकरण 



नवी दिल्ली : खरा पंचनामा 

केंद्र सरकारने लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतींना दोन्ही सभागृहांचे कामकाज बोलावण्याची विनंती केली आहे. सरकारच्या या विनंतीवरून ३० नोव्हेंबर रोजी लोकसभेचे, तर २ डिसेंबर रोजी राज्यसभेचे कामकाज सुरू होणार आहे.

या अधिवेशनाच्या कामकाजात परिसीमन विधेयक (मतदारसंघ पुनर्रचना) मंजूर करून घेण्यासाठी भाजपने जोर लावला असून समीकरणे जुळवली असल्याची चर्चा आहे.

सुमारे आठ महिन्यांपूर्वीही विधेयक सभागृहात मांडण्यात आली होती. मात्र, हे घटनादुरुस्ती विधेयक असल्याने त्यावेळी सरकारला आवश्यक असलेले दोन-तृतीयांश बहुमताअभावी मंजूर करता आले नाही. आता सरकार पुन्हा एकदा नव्याने आकड्यांची जुळवाजुळव करत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, सभागृहात दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्यासाठी सध्या तीन मुख्य शक्यता दिसून येत आहेत.

लोकसभेतील जागांचे नेमके गणितः
एकूण जागाः ५४३
सध्याचे सदस्यः ५४०
दोन-तृतीयांश बहुमतासाठी आवश्यक संख्याः ३६०
एनडीएचे संख्याबळः ३२०
समीकरण १: डीएमके, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि वायएसआरसीपीचा पाठिंबा

जर या तिन्ही पक्षांनी विधेयकाला पाठिंबा दिला, तर एनडीएचे एकूण संख्याबळ ३५४ पर्यंत पोहोचेल. यामध्ये एनडीएचे ३२०, डीएमकेचे २२, राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे ८ आणि वायएसआरसीपीच्या ४ खासदारांचा समावेश असेल.

हा आकडा दोन-तृतीयांश बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ३६० या संख्येपेक्षा ६ मतांनी कमी पडतो. (आकडेवारीनुसार ३२०+२२+८+४ = ३५४ होतात, जे ३६० पेक्षा ६ ने कमी आहेत).
समीकरण २: शरद पवार गट व YSR चा पाठिंबा अन् डीएमकेची अनुपस्थिती

या शक्यतेनुसार राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि वायएसआरसीपीने विधेयकाच्या बाजूने मतदान केले आणि डीएमकेने मतदानातून बाहेर राहणे पसंत केले, तर एनडीएच्या बाजूने ३३२ मते (३२० + ८ + ४) पडतील. अशा स्थितीत मतदान करणाऱ्या एकूण सदस्यांची संख्या ५१८ राहील आणि दोन-तृतीयांश बहुमतासाठी ३४६ मतांची गरज असेल.

या स्थितीतही सरकार दोन-तृतीयांश बहुमतापेक्षा १४ मतांनी मागे राहील. जर डीएमके आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) या दोन्ही पक्षांनी विधेयकाला पाठिंबा दिला आणि वायएसआरसीपी मतदानापासून दूर राहिली, तर एनडीएला ३५० मते (३२० + २२ + ८) मिळतील. या वेळी एकूण ५३६ खासदार मतदानात सहभागी होतील, ज्यामुळे बहुमताचा आकडा ३५८ इतका असेल.

या समीकरणानुसारही एनडीएला दोन-तृतीयांश बहुमतासाठी ८ खासदारांची कमतरता भासेल.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.