रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार? परिणय फुके यांचा मोठा दावा !
मुंबई : खरा पंचनामा
भाजप नेते आणि आमदार परिणय फुके यांनी रोहित पवार यांच्या राजकीय भवितव्याबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. रोहित पवार हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोडून काँग्रेसमध्ये सामील होतील, अशी आपली भविष्यवाणी खरी ठरेल, असे फुके यांनी म्हटले आहे.
फुके यांनी सांगितले की, रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत त्यांचे मतभेद वाढले आहेत. रोहित पवारांना पक्षामध्ये कोणीही महत्त्व देत नसल्याने ते प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असा आरोपही फुके यांनी केला. त्यांच्या अलीकडील मोर्चाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यांची पत्रकार परिषदही पक्षश्रेष्ठींना माहिती नसताना झाली, असे त्यांनी नमूद केले. याशिवाय, फुके यांनी सूक्ष्म वित्त (मायक्रो फायनान्स) कंपन्यांच्या बेकायदा वसुलीवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्रात शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांना तुरुंगात टाकले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, संजय राऊत आणि धनगेकर यांच्या वक्तव्यांना गांभीर्याने न घेण्याचा सल्लाही फुके यांनी दिला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.