लष्करी गाडी दरीत कोसळली; 16 जवान शहीद
सिक्कीम : खरा पंचनामा
सिक्कीम येथे भारतीय लष्कराची गाडी दरीत कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात १६ जवान शहिद झाले असून ४ जवान जखमी झाले आहेत. उत्तर सिक्कीममधील जेमा येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे.
अपघातग्रस्त लष्करी वाहन सकाळी चतनहून थंगूच्या दिशेने निघाले होते.. यावेळी जेमाकडे जाताना एका तीव्र वळणावर गाडी घसरून खोल दरीत कोसळली. या अपघातानंतर तात्काळ बचाव मोहीम सुरू करण्यात आली. जखमी झालेल्या ४ जवानांना विमानाने हलवण्यात आले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केला आहे. उत्तर सिक्कीममध्ये झालेल्या एका रस्ते अपघातात भारतीय लष्कराच्या जवानांच्या निधनाने खूप दुःख झाले. त्यांच्या सेवेबद्दल आणि वचनबद्धतेबद्दल देश मनापासून कृतज्ञ आहे. शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना आहेत असे ट्विट राजनाथ सिंह यांनी केलं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.