Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

देशात आणखी एक मोठा बँकिंग घोटाळा!

देशात आणखी एक मोठा बँकिंग घोटाळा!नवी दिल्ली : खरा पंचनामा

सीबीआयने कोलकाता येथील कॉर्पोरेट पॉवर लिमिटेड आणि तिच्या संचालकांविरुद्ध चार हजार कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात फिर्याद दिली आहे. ज्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामध्ये कंपनीचे प्रमोटर्स किंवा डायरेक्टर, अज्ञात सरकारी कर्मचारी आणि इतर काही जणांचा समावेश आहे.

सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, २० बँकांच्या कन्सोर्टियमसोबत बँक फ्रॉड करण्यात आला आहे. याप्रकरणी सीबीआयने मुंबई, नागपूर, कोलकाता, रांची, दुर्गापूर, विशाखापट्टणम आणि गाझियाबाद येथील १६ ठिकाणी छापे टाकले आहेत. 

फिर्यादीत अभिजीत ग्रुपचे चेअरमन मनोज जयस्वाल, मॅनेजिंग डायरेक्टर अभिषेक अग्रवाल आणि इतरांचा समावेश आहे. २००९ ते २०१३ या कालावधीत कथित कर्जदाराने खोटे प्रोजेक्ट स्टॉक स्टेटमेंट सादर करून बँकेचा फंड डायव्हर्ट केला होता.  पार्टी आणि फंडशी संबंधी ट्रांजक्शनला अनेक कंपन्यांना डायव्हर्ट करण्यात आले. जे डमी अकाउंट होते. असे करून कर्जदाराने फंडचा चुकीचा गैरवापर केला आहे. 

सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेत मेहुल चोक्सी-नीरव मोदीसारखा आणखी एक घोटाळा समोर आला आहे. ३४ बनावट बँक गॅरंटीद्वारे १६८.५९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने एका बँक अधिकाऱ्याविरुद्ध फिर्याद नोंदवली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.