Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलीस अधिकाऱ्यांना विनंती बदल्यांची प्रतीक्षा

पोलीस अधिकाऱ्यांना विनंती बदल्यांची प्रतीक्षा 



सांगली : खरा पंचनामा

राज्य शासनाने नुकत्याच पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. परंतु, वैद्यकिय, कौटुंबिक व इतर कारणाकरिता विनंती बदलीसाठी अर्ज केलेल्या राज्यभरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या अद्याप झालेल्या नाहीत. त्यामुळे विनंती बदल्या कधी होणार अशी विचारणा अधिकाऱ्यांमधून होत आहे.

राज्यभरातील सुमारे १७० पोलीस अधिकऱ्यांनी विनंती बदल्यांची मागणी  केल्याचे समजते. कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या आतापर्यंत बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे इतर पोलीस अधिकारी हे विनंती बदलीच्या प्रतिक्षेत आहेत.

गेल्या दोन वर्षात कोरोना काळात राज्यातील बऱ्याच अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या होत्या. कार्यकाळ पूर्ण होऊनही अनेक अधिकाऱ्यांना त्याठिकाणी काम करावे लागत होते. मात्र; कोरोना निर्बंध उठवल्यामुळे एप्रिल- मे या महिन्यात मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या. जूननंतर राज्यात सत्तांतर झाले. त्यामुळे बदल्या रखडल्या. 

दरवर्षी एप्रिल व मे या दोन महिन्यात बदल्या होतात. कोरोना काळ आणि राज्यातील सत्तांतर व गणेशोत्सव, नवरात्रौत्सवानंतर या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीला वेग आला. ७ नोव्हेंबरला कार्यकाळ पूर्ण झालेले पोलीस अधीक्षक, पो- लीस उपायुक्तांच्या तर ९ डिसेंबरला २२५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या.   राज्यात ३२ पोलीस निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्त/पोलीस उपअधीक्षक पदोन्नती देण्यात आली. पण त्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

शिवाय काही निरीक्षक उपअधीक्षक पदाच्या पदोन्नतीसाठी प्रतीक्षेत आहेत. तेही बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या आधी  याबाबत निर्णय होण्याबबाबत साशंकता आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.