Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगली लोकसभेला आघाडीकडून 'प्रतीकच'!

सांगली लोकसभेला आघाडीकडून 'प्रतीकच'!
काँग्रेसकडून राष्ट्रवादी खेचणार मतदारसंघ?



सांगली : खरा पंचनामा

अलीकडे राज्यातील राजकीय वातावरण फारच अस्थिर आहे. त्यातच सर्व लोकप्रतिनिधीना आगामी विधानसभा, लोकसभा निवडणूकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे त्यांनी निवडणूकीची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. येत्या निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघात प्रतीकच नाव फायनल होणार असल्याचे दिसून येत आहे. पण हा प्रतीक काँग्रेसचा नसून राष्ट्रवादीचा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. विद्यमान आमदार मतदारसंघ सुरक्षित ठेवण्यात व्यस्त आहेत तर अन्य इच्छुकांनीही तयारी सुरू केली आहे. सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी रंगीत तालीम घ्यायचे ठरवले आहे. त्यासाठी विद्यमान आमदार यांच्यासह इच्छुक तयारीला लागले आहेत.

या सर्व गदरोळात सांगली लोकसभा मतदारसंघात मात्र राजकारणात 'चाणक्य' समजल्या जाणाऱ्या साहेबांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. या साहेबांनी काँगेसमधील बेदिली लक्षात घेऊन पध्द्तशीर पावले उचलली आहेत. त्यातच मागील निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा आणि राष्ट्रवादीशी पहिल्यांदा झालेल्या आघाडीत काँग्रेसने स्वतःकडे ठेवलेला लोकसभा मतदारसंघ शेतकरी संघटनेला द्यावा लागला.

काँग्रेसचे प्रबळ दावेदार असलेल्या दादा घरण्यानेच तो सोडून दिला त्यावर न थांबता या घराण्यातील विशाल पाटील यांनी ही निवडणूक शेतकरी संघटनेच्या उमेदवारीवर लढवली. तेथेच हा मतदारसंघ काँग्रेस किंबहुना दादा घराण्याच्या हातून निसटला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याचीच वाट पहात होते. त्यांनी आता हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा यासाठी फिल्डिंग लावली आहे. येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गटासाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे. त्यामुळेच भविष्यात सांगली लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस दावा सांगण्याची शक्यता आहे. आणि त्यांचा उमेदवार प्रतीक जयंत पाटील हाच असणार यात शंका नाही.

दादा घराण्यातील माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी सध्या राजकिय सन्यास घेतला आहे. विशाल पाटील कार्यरत आहेत पण त्यांना मुंबई सुटत नाही. नांदरे सारख्या दादा घराण्याशी एकनिष्ठ गावात त्या घराण्याचा राजकीय वारसदार एका कार्यक्रमात जाऊ शकत नाही. आणि ग्रामस्थांनी सांगली विधानसभा मतदारसंघातील दुसऱ्या नेत्याला त्या कार्यक्रमात बोलावले म्हणून आगपाखड करतो असा नेता लोकसभेत काय नेतृत्व करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एकंदरीत सध्याचे वातावरण पाहता लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात एक प्रतीक असणार आहे जे नक्की आहे. पण तो प्रतीक राष्ट्रवादीचा की काँग्रेसचा हे लवकरच स्पष्ट होईल.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.