Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

काश्मीरमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त

काश्मीरमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त



श्रीनगर : खरा पंचनामा

जम्मू आणि काश्मिर येथे पोलिस आणि लष्कराने संयुक्तपणे केलेल्या कारवाईत मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. त्यात 8 एके 74 रायफली, 12 चिनी पिस्तूल, शेकडो काडतुसे आणि ग्रेनेडस् यांचा समावेश आहे.

पोलिस आणि लष्कराने एकत्रितरित्या गेल्याच आठवड्यात पाकिस्तानातून चालवले जाणारे एक मोठे ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणले होते. पाठोपाठ आता हा घातक शस्त्रसाठा उरी सेक्टरमध्ये हस्तगत करण्यात आला आहे. 

याबाबत कर्नल मनीष पुंज म्हणाले, एका छोट्या लढाईचा शस्त्रसाठा जप्त करण्यात यश आले असून त्यात 8 एके 74 रायफली, 24 मॅगझिन्स, 560 जिवंत काडतुसे, 12 चिनी पिस्तूल, 24 मॅगझिन्स, 14 पाकिस्तानी आणि चिनी ग्रेनेडस् तसेच पाकिस्तानी झेंडा छापलेले 81 बलून्स यांचा समावेश आहे.

एका खबऱ्याकडून शस्त्रसाठा आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस व लष्कराच्या संयुक्त पथकाने उरी सेक्टरमधील हथलंगा भागात नाकाबंदी करून घरांची झडती सुरू केली. त्यात हा साठा हस्तगत करण्यात आला, असे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.