Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगली मॅरेथॉनमध्ये प्रवीण कांबळे विजेता

सांगली मॅरेथॉनमध्ये प्रवीण कांबळे विजेता 

हजारो स्पर्धकांच्या उपस्थितीत स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद सांगली : खरा पंचनामा

सांगलीत रविवारी आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत सांगलीच्या प्रवीण कांबळे यांनी विजेतेपद मिळवले. ती हजारहून अधिक स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते. संगलीकरांनी या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद दिला. महिला आणि पुरुष तसेच खुला गट अशा विविध सात गटात ही स्पर्धा झाली. 

सांगलीचे क्रीडाधिकारी माणिक वाघमारे, साताऱ्याचे युवराज नाईक, शिव छत्रपती पुरस्कार विजेते युवराज खटके, पालघरचे क्रीडाधिकारी सुहास व्हनमाणे, डॉ. गणेश चौगुले, सूर्यवंशी कंसक्ट्रन्सचे दीपक सुर्यवंशी, माजी महापौर सुरेश पाटील, डॉ. अजित मेहता यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. 

संजय घोडावत विद्यापीठाचे विषवस्त विनायक भोसले, कुलगुरू अरुण पाटील, सिद्धी व्हील्सचे श्रीकांत तारळेकर, शुभम हडदरे, कर्मवीर पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. 

राधेय सेवा फौंडेशन या स्पर्धेचे मुख्य आयोजक होते. तर सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका, रोटरी क्लब ऑफ सांगली मिडटाऊन, स्पंदन प्रतिष्ठान, विश्रामबाग सिनियर अथलेटिक्स ग्रुप, इंडियन डेंटल असोसिएशन, मेडिकल असोसिएशन या स्पर्धेचे सह प्रायोजक होते. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल असा : खुला गट : प्रवीण कांबळे, आनंद गावकर, विशाल कांबीरे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला. 10 किमी पुरुष : अंकुश हाके, सोमनाथ तांबे, राजेंद्र कुंभार. 10 किमी महिला गट : श्रावणी गोंदकर, भक्ती पोरे, मोहिनी इसापुरे. 18 वर्षाखालील मुले : दशरथ घुमरे, सतीश सरगर, रोहन तांदळे. 18 वर्षाखालील मुली : वैभवी कुंभार, प्रणाली मंडले, गीता कुंभार. 

14 वर्षाखालील मुले : गजानन सरगर, ओम देशमुख, संस्कार चौगुले. 14 वर्षाखालील मुली : भक्ती मगदूम, चैताली चव्हाण, तनुजा सोलांकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला. अरे माधव मोटर्सने या स्पर्धेत पायलटिंगचे काम केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.