अनिल देशमुखांच्या जामीनावरील निकाल राखून ठेवला
मुंबई : खरा पंचनामा
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावरील निकाल उच्च न्यायालयाने राखून ठेवला. मुंबई सत्र न्यायालयानं जामीन नाकारल्याच्या निर्णयाला देशमुखांकडून उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. याबाबत उच्च न्यायालयात दोन्ही बाजूकडून युक्तिवाद करण्यात आला.
युक्तिवाद पूर्ण झाल्यांनतर कोर्टाने देशमुखांच्या जमीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला आहे.
भ्रष्टाचाराचा आरोप असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख जामीन अर्ज सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने दिवाळी पूर्वी फेटाळून लावला. त्याविरोधात देशमुख यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. न्या. मकरंद कर्णिक यांच्यासमोर याबाबत सुनावणी सुरू आहे. वाझे १६ वर्षांपासून निलंबित आहे. मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणातही त्याला अटक करण्यात आली आहे. वाझेच्या जबाबावर संपूर्ण प्रकरण अवलंबून असल्याच असा पुनरुच्चार देशमुखांच्यावतीने अँड. विक्रम चौधरी यांनी केला.
वेळेअभावी सीबीआयचा युक्तिवाद पूर्ण होऊ न शकल्यामुळे न्यायालयाने सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब केलेली. मात्र आज पूर्ण युक्तिवाद ऐकल्यानांतर जामीन अर्जावर उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.