Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ट्रक कारच्या धडकेत सांगलीचे दोघे ठार, बार्शी सोलापूर रस्त्यावरील घटना

ट्रक कारच्या धडकेत सांगलीचे दोघे ठार, बार्शी सोलापूर रस्त्यावरील घटना




सोलापूर : खरा पंचनामा

बार्शी -सोलापूर मार्गावरील शेळगाव (आर) येथे ट्रक व कारच्या समोरासमोर धडकेत रघुनाथ भगवान डोरले, अमित अशोक कोथळे (रा .सांगली) हे दोघेजण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली . 

याबाबत माहिती अशी की, सांगली येथील रघुनाथ भगवान डोरले, अमित अशोक कोथळे , प्रताप शंकर देशमुख हे तिघेजण चार चाकी वॅगनार (क्रमांक एम एच १२ एल जे ७०४५) मधून  बार्शी परिसरातील एका गावा मध्ये लग्नासाठी आले होते . लग्न उरकून ते सांगली कडे जात होते .गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ट्रक (क्रंमाक एम एच ११ ए एल ७००९) शेळगाव मार्गे सोलापूर कडे जात असताना. वॅगनार कार ट्रकला मागील बाजूस जावून धडकली. या अपघातात कार मधील दोघेजण ठार झाले तर कार मधील प्रताप शंकर देशमुख हे गंभीर जखमी झाले. जखमीला उपचारासाठी सोलापूर येेेथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

यातील मृत अमित कोथळे हा पोलिसांच्या मारहाणीत ठार झालेल्या अनिकेत कोथळे याचा भाऊ आहे. दोघांच्या मृत्यूमुळे सांगली, सांगलिवाडीत
शोककळा पसरली आहे.


कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.