Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मलाही तुरुंगात टाकण्याचा प्लॅन होता : फडणवीस

मलाही तुरुंगात टाकण्याचा प्लॅन होता : फडणवीस



नागपूर : खरा पंचनामा

महाविकास आघाडी सरकार सूडबुद्धीने वागत होतं. आमच्या अनेक आमदारांना त्यांनी त्रास दिला. मला देखील तुरुगात टाकण्यासाठी प्लॅन आखला असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केला. आम्ही तसे वागणार नसल्याचेही फडणवीस म्हणाले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलेल्या भाषणात ठाकरे गटाने केलेल्या आरोपांवर उत्तरे दिली. तर अंतिम आठवडा प्रस्तावावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत गृहविभागाविषयी माहिती दिली. यावेळी विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांनाही त्यांनी खोडून काढलं. 

मजूर म्हणून निवडून आलेले 25 आमदार होते. पण तरी देखील दरेकर आणि प्रसाद लाड यांना टार्गेट केले. मला देखील कसे जेलमध्ये टाकता येईल याचा प्लॅन ठरला. संजय पांडे यांना जबाबदारी दिली होती. कसेही करून फडणवीस यांना अडकवा. कंगना राणावत हिचे घर तोडण्यासाठी वकिलाला 80 लाख दिले. रवी राणा आणि नवनीत राणा यांना 13 दिवस जेलमध्ये टाकले. 

आमच्या मंत्र्यांवर आरोप लावता आणि राजीनामा मागता. तुमचे मंत्री जेलमध्ये गेले तरी राजीनामा घेतला नाही. आमच्या मंत्र्यामध्ये चूक असेल तर राजीनामा घेऊ. मुख्यमंत्री यांच्यावर आरोप करून तुम्ही तोंडावर पडलात, असेही फडणवीस म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.