Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कुपवाङमध्ये सांबाराची यशस्वी सुटका

कुपवाङमध्ये सांबाराची यशस्वी सुटका


 
कुपवाड : खरा पंचनामा

पाच दिवसांपुर्वी मिरज एमआयडीसी परिसरात नर जातीचे सांबर आले होते. तेथील लोकांनी हुस्कावल्यानंतर ते कुपवाडच्या दिशेने गेले. वनविभागाची त्याच्यावर नजर होतीच. त्याच दिवशी सायंकाळी त्याने भारत सुतगिरणी परिसरात प्रवेश केला. दुसऱ्या दिवशी त्याला रेस्क्यू करण्याचा प्रयत्न झाला मात्र त्याने पळ काढला. त्यानंतर तब्बल १२० तासांच्या प्रयत्नानंतर ते सांबर सापडले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला निसर्गात मुक्त करण्यात येणार असल्याचे वनविभागाने सांगितले.

मिरज औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीजवळ २ डिसेंबर रोजी सकाळी नागरिकांना सांबर असल्याचे दिसले. काही वेळातच ही माहिती अनेकांना समजल्याने सांबर पाहण्यासाठी परिसरात गर्दी झाल्याचे चित्र होते. नागरिकांच्या वाढत्या गोंधळामुळे सांबर बिथरले. लोकवस्तीत सांबर आल्याची माहिती वनविभागास मिळताच त्यामध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परंतू गोंधळात सांबराने स्वत:च्या बचावासाठी तेथून जवळच असलेल्या शेतात पळ काढला. दरम्यान वनविभागासह प्राणीमित्रांची टीम त्याच्यावर नजर ठेवून होते. त्यानंतर ते सांबर कुपवाड रस्त्यावरील भारत सुतगिरणी परिसरात गेले. सांबराला रेस्क्यू करण्यासाठी परिसरात शेडनेट बांधण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. परंतू बिथरलेल्या त्या सांबराने तेथे बांधलेल्या शेडनेवरून धूम ठोकली. 

गेल्या तीन दिवसांपासून त्याच्यावर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी नजर ठेवली होती. मुक्त वावर त्याचा गेल्या तीन दिवसांपासून सुरू होता. काल रात्रीच्या वेळी पुन्हा रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले. दरम्यान, अगदी नियोजनबद्ध पद्धतीने ऑपरेशनला सुरूवात झाली. मध्यरात्रीच्या तीनच्या सुमारास ते सांबर सापडले. त्याला लवकरच निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले जाणार आहे. 

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.