Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तासगावमध्ये चोरट्याला अटक, तासगाव पोलिसांची कारवाई

तासगावमध्ये चोरट्याला अटक, तासगाव पोलिसांची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

तासगाव तालुक्यातील सावळज अंजनी रस्त्यावरील कालव्याजवळ एकाला शिवीगाळ, धक्काबुक्की करत लुटल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. अजय सुखदेव चव्हाण (वय २३, रा. अंजनी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तासगाव पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. 

याप्रकरणी अमोल शिंदे (वय ४८, रा. मिरज) यांनी फियार्द दिली आहे. दि. ३ डिसेंबर रोजी शिंदे भाडेकरूला सावळज येथे सोडून अंजनी, गव्हाणमागेर् मिरजेकडे निघाले होते. त्यावेळी सावळज अंजनी रस्त्यावरील कालव्याजवळ दोन व्यक्तींनी त्यांना अडवले. त्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की करत त्यांच्याकडील मोबाईल, रोकड जबरदस्तीने काढून घेतली. याप्रकरणी शिंदे यांनी तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. 

तासगाव पोलिस ठाण्याकडील सोमनाथ गुंडे यांना सोमवार पेठ येथे एक तरूण चोरीचा मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्यांच्यासह पथकाने तेथे सापळा रचून चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली. त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीचा मोबाईल, रोकड, एक मोटारसायकल असा ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अतिरिक्त अधीक्षक आंचल दलाल, उपअधीक्षक अश्विनी शेंडगे यांच्या मागर्दशर्नाखाली सहाय्यक निरीक्षक बजरंग झेंडे, नितीन केराम, अमित परीट, अभिजित गायकवाड, सोमनाथ गुंडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.