Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्याकडून अंमलदाराना पदोन्नतीचे गिफ्ट

पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्याकडून अंमलदाराना पदोन्नतीचे गिफ्ट 



सांगली : खरा पंचनामा 

वर्ष संपत असताना सांगलीचे पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी जिल्ह्यातील पोलिस अंमलदाराना मोठे गिफ्ट दिले आहे. हवालदार आणि पोलिस नाईक पदावर काम करत असलेल्या 293 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. 

सांगली पोलीस दलातील ३३ पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. तर 260 पोलिस नाईक यांना हवालदार पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी मंगळवारी काढले आहेत. 

पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, यांनी पोलीस कर्मचारी यांना नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी पदोन्नतीची भेट दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.