Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

उमेश कोल्हेंचा खून नुपूर शर्मांच्या समर्थनातूनच!

उमेश कोल्हेंचा खून नुपूर शर्मांच्या समर्थनातूनच!अमरावती : खरा पंचनामा

भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्यामुळेच उमेश कोल्हे यांचा खून झाला होता, असा खुलासा NIA ने केला आहे. कोल्हेंच्या हत्येसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अमरावतीचे फार्मासिस्ट उमेश कोल्हे प्रकरणात NIA ने ११ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलंय.

उमेश यांनी भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली होती. एनआयएने आरोप पत्रात दावा केलाय की, मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचं समर्थन करणाऱ्या व्हॉट्सअप पोस्ट उमेश यांनी शेअर केल्या होत्या. त्याचाच बदला घेण्यासाठी आरोपींनी एक टेररिस्ट गँग तयार केली होती.

विशेष एनआयए कोर्टात हे आरोपपत्र सादर करण्यात आलं. उमेश कोल्हेंचे मारेकरी फरार असून त्यांचा तपास सुरु ठेवावा, अशी एनआयएची विनंती कोर्टाने मान्य केली.  या आरोपपत्रात अब्दुल शेख, मोहम्मद शोएब, आतिब राशिद, युसूफ खान, इरफान खान, अब्दुल अरबाज, मुशफिक अहमद, शेख शकील, शाहिम अहमद, मुदस्सिर अहमद आणि शाहरूख खान यांचा समावेश आहे. या सर्वांना अटक करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.