Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नयना पुजारी हत्याकांडाची आता हायकोर्टात सुनावणी

नयना पुजारी हत्याकांडाची आता हायकोर्टात सुनावणी



मुंबई : खरा पंचनामा

पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिलेल्या नयना पुजारी बलात्कार व हत्याकांडाची लवकरच मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना सुनावलेली फाशीची शिक्षा कायम करण्यासाठी राज्य सरकारने अर्ज केला आहे.

या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठापुढे जानेवारीपासून सुनावणी सुरू होईल. फाशीवर शिक्कामोर्तब करण्याचा राज्य सरकारचा अर्ज तसेच शिक्षेविरोधातील आरोपींच्या अपिलांवर एकत्रित सुनावणी केली जाण्याची शक्यता आहे, असे अॅड. निंबाळकर यांनी सांगितले. 

नयना पुजारी ही सॉफ्टवेअर इंजिनीअर होती. 7 ऑक्टोबर 2009 रोजी नराधमांनी तिच्यावर बलात्कार करून हत्या केली. याप्रकरणी योगेश राऊत, महेश ठाकूर आणि विश्वास कदम या आरोपींना पुण्याच्या विशेष न्यायालयाने मे 2017 मध्ये फाशी ठोठावली होती. तिघेही सध्या येरवडा कारागृहात आहेत. 

या प्रकरणाची पुण्यातील विशेष न्यायालयात सुनावणी झाली होती. त्यावेळी येरवडा पोलिस ठाण्यातील तत्कालीन तपास करणारे पोलिस अधिकारी दीपक सावंत, विश्वनाथ घनवट यांनी अतिशय बारकाईने, कसून तपास करून पुरावे जमवले आहेत.

या प्रकरणातील तपास हा योग्य मार्गाने केलेला निष्पक्ष तपास आहे. या खटल्याचे वैशिष्ट्य म्हणजे एकही साक्षीदार विरोधी झाला नाही. साक्षीदारांसह सर्व साक्षीदार जे आरोपींचे मित्र आहेत ते ठाम होते आणि त्यांनी सत्य रेकॉर्डवर आणण्यासाठी सहकार्य केले. फिर्यादी साक्षीदारांच्या या धाडसी वृत्तीचेही कौतुक केले जात आहे, असे न्यायाधीशांनी निकाल देताना म्हटले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.