Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अत्याचार करणाऱ्यावर न्यायालयातच सपासप वार

अत्याचार करणाऱ्यावर न्यायालयातच सपासप वार 



यवतमाळ : खरा पंचनामा 

यवतमाळ जिल्ह्यात न्यायालयाच्या आवारात एका संशयितावर फिर्यादी महिलेने कटरने सपासप वार करत हल्ला केला. यामध्ये विशाल शेंडे जखमी झाला आहे.  

विशाल शेंडे हा एका महिलेवरील अत्याचार प्रकरणात संशयित आहे. आज विशालची हजेरी न्यायालयात होती. यावेळी फिर्यादी महिला त्या ठिकाणी आली आणि त्या महिलेने त्याच्यावर कटरने हल्ला केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत महिलेला ताब्यात घेतले. न्यायालयाच्या आवारात झालेल्या घटनेने खळबळ उडाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.