Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

थकबाकीपोटी जप्त मालमत्ता महापालिकेच्या नावावर होणार!

थकबाकीपोटी जप्त मालमत्ता महापालिकेच्या नावावर होणार! 



सोलापूर : खरा पंचनामा 

सोलापूर महानगरपालिकेकडून सध्या मालमत्ता कर थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. गेल्या सात दिवसात ९ थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. थकबाकीची रक्कम पूर्णपणे भरल्याशिवाय सील काढले जाणार नाही, थकबाकीची रक्कम न भरल्यास संबंधितांची मालमत्ता महापालिकेच्या नावावर करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल, असा इशारा उपायुक्त विद्या पोळ यांनी दिला आहे. 

महापालिकेच्या कर विभागाने पेठनिहाय, विभागनिहाय मोठ्या थकबाकीदारांची नावे काढली. त्यांच्यावर जप्तीची कारवाई सुरू आहे. आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या आदेशानुसार शहरातील मोठ्या थकबाकीदारावर जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. यासाठी कर संकलन विभागाने पाच पथके तैनात केली आहेत. 

काही बडे थकबाकीदार अद्यापही कर भरण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत असल्याने महापालिकेने आता थकबाकीदाराविरोधात कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला मोठ्या थकबाकीदाराविरोधात कारवाई सुरू केली, मात्र आता १५ डिसेंबर २०२२ नंतर सरसकट वसुली व जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचेही विद्या पोळ यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.