...बाबा तुम्ही का गेला?
सांगली : खरा पंचनामा
Man proposes, God disposes...कधी कधी असच होत..दुःख न संपणार... कुणीही त्याची पोकळी भरून न काढणार असते. आपल्या आयुष्यात आई-वडिलांची जागा कोणीच घेऊ शकत नाही..नुकत्याच घडलेल्या कालच्या अपघातात कोथळे कुटूंबीयांच्या घरचा कर्त्या पुरुषावर काळाने घाला घातला अन क्षणात होत्याच नव्हत झाल.
त्याची पत्नी आणि मुलांवर, घरच्यांच्या मनावर मोठा आघात झाला..मुलांनी फोडलेला हंबरडा..त्यांच्या आयुष्यात बाबांची निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून येणारी आहे..लहान वयात काळाने त्यांना मोठं व्हा, अस जणू चित्रच उभं केलं आहे..बाबा तुमि का गेला, आम्ही तुम्हाला जाऊ नका बोललो होतो... अशी किंकाळी हृदय पिळवटून टाकणारी होती..सगळं काही स्तब्ध, शांत झालं होतं..देवाला माझा बाबा का हवा होता..अस चिमुकल्याचा देवाला प्रश्न होता...उत्तर मात्र याच कोणाकडे नव्हतं...
चिमुकल्या मुलांची आई हताश होती..आपल्याला पिल्लांना कस सावरू..माझं आयुष्य कस पूढे नेऊ..ही किंकाळी मन बिथरून टाकणारी होती..घरातील सगळे गहिवरले होते...शेवटी नियतीचा खेळ काय माहिती...काय त्याच्या मनात आहे काय माहिती...पण चिमुकल्याची किंकाळी न संपणारी होती... आई मुलांना काय उत्तर देऊ या विचाराने आपल्या पतीस अमित कोथळे यांना साद घालत होती...अहो तुमि का गेलात.…..
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.