Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जुहू येथे वृद्ध महिलेचा मुलाकडून खून

जुहू येथे वृद्ध महिलेचा मुलाकडून खूनमुंबई : खरा पंचनामा

जुहूमध्ये एका वृद्ध महिलेचा खून तिच्या मुलानेच केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलासह त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.

सचिन कपूर, लालूकुमार मंडल अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वीणा कपूर (वय 74)असे मृत महिलेचे नाव आहे. बेसबॉल बॅटने मुलाने आपल्या आईचा खून केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. दोन्ही संशयितांना 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आईची घरातच हत्या करुन मुलाने घरातील नोकराच्या मदतीने आईचा मृतदेह एका बॉक्समध्ये भरला. त्यानंतर हा बॉक्स कारमध्ये ठेवून तो मृतदेह नदीत फेकून दिला. पण त्याआधी त्याने आईचा जीव घेण्यासाठी बेसबॉल बॅटने वीणा कपूर यांना मारहाण केली होती, अशी माहिती जुहू पोलीसांनी दिली आहे.
ज्या घरात हे हत्याकांड घडलं, त्या घरात सीसीटीव्ही देखील लावण्यात आले होते. पण हत्येआधी सचिन याने सीसीटीव्ही काढून त्यांची विल्हेवाट लावली होती. असा संशय पोलिसांना आहे. 

मृतदेह एका बॉक्समध्ये भरुन हा बॉक्स माथेरान परिसरातील एक नदीत फेकण्यात आला होता. शिवाय सीसीटीव्ही आणि डीव्हीआर देखील त्याच ठिकाणी फेकून देण्यात आलेला. वीणा कपूर बेपत्ता असल्याची तक्रार जुहू पोलीस स्थानकात करण्यात आली होती. या तक्रारीवरुन पोलिसांनी इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास सुरू केला. त्यामध्ये सचिन कपूर हा आपल्या नोकराच्या साथीने एक बॉक्स इमारतीच्या आवारातून घेऊन जाताना दिसला होता.

पोलिसांनी सचिन आणि त्याचा नोकर लालूकुमार यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. त्यावेळी दोघांनीही आपणच हत्या केली असल्याचं कबुली दिली. त्यानंतर पोलिासंनी दोघांनाही अटक केली.
सचिन कपूर आणि वीना कपूर यांच्या संपत्तीचा वाद होता. 6 डिसेंबर रोजी त्यांचं कडाक्याचं भांडण झालं होतं. त्यातूनच सचिन याने आईच्या हत्येचा कट रचला असल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी आता अधिक तपास केला जातोय.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.