Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नगर जिल्ह्यात ३५ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

नगर जिल्ह्यात ३५ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त



अहमदनगर : खरा पंचनामा

अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाने १ ते २० डिसेंबर या कालावधीत विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत ३५ लाख रूपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला. गोवा राज्य निर्मित विदेशी मद्यसाठा जप्त करण्याबरोबरच अवैध मद्यावर कार्यवाही करून ११७ गुन्हे दाखल करत १०१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

जामखेड येथील राजेवाडी फाटा बस स्थानकासमोर २० डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या कार्यवाहीत गोवा बनावटीचा मद्यसाठा व एका वाहनासह ६ लाख ३० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ग्रामपंचायत निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर दिनांक १ ते २० डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील अवैध मद्यावर कार्यवाही करण्यात आली. या कारवाईत देशी-विदेशी मद्य व ११ वाहनांसह २८ लाख ८३ हजार २७५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी, पुणे विभागीय आयुक्त अनिल चासकर व अहमदनगरचे अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मदयार्क, हात्तभट्टी दारु, ताडी इत्यादी निर्मिती व विक्रीवर कारवाईसाठी नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच आपल्या परिसरात अवैध मद्यविक्री होत असल्यास बाबतची माहिती उत्पादन शुल्क विभागास द्यावी. असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.