Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

रश्मी शुक्ला यांचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळला

रश्मी शुक्ला यांचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळलापुणे : खरा पंचनामा

फोन टॅपिंग प्रकरणात पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट पुणे न्यायालयाने फेटाळला आहे. 

शुक्ला यांच्यावर अनेक राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता. मात्र सत्ताबदल झाल्यानंतर रश्मी शुक्ला यांना क्लिनचीट देण्यात आली होती. पुणे पोलिसांनी याबद्दल न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. मात्र न्यायालयाने हा रिपोर्ट फेटाळला आहे. त्यामुळे माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अडचणी वाढणार आहेत.

पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त राहिलेल्या रश्मी शुक्ला यांनी काही आमदार, मंत्र्यांचे फोन टॅप केले होते. तसेच यासाठी कुठलीही परवानगी घेण्यात आली नव्हती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपास देखील झाला. मात्र या तपासातून काहीही निष्पन्न झाले नाही. यानंतर रश्मी शुक्ला यांनी पोलिस विभागाकडून क्लीन चिट देण्यात आली. तसेच यासंदर्भात पुणे न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला होता, जो न्यायालयाने फेटाळला आहे.

रश्मी शुक्ला यांनी कोणाच्यातरी सांगण्यावरून हे फोन टॅप केल्याचे आरोप करण्यात आले होते. यामुळे आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना हा धक्का असून यामुळे सरकरच्या देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.