पुण्यात पावणेदोन कोटींची विदेशी दारू जप्त
पुणे : खरा पंचनामा
नवीन वर्षाच्या स्वागताला १ दिवस उरला आहे. मात्र त्याआधीच पुण्यात कोट्यवधी रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तब्बल १ कोटी ७० लाख रुपयाची विदेशी दारू जप्त केली आहे.
याप्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या जवळील मुद्देमालासह एक चार चाकी गाडी देखील जप्त केली आहे. या कारवाईत २ ट्रक आणि त्यात तब्बल २००० हून अधिक दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले.
राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने पुण्यातील नवले ब्रीज आणि तळेगाव दाभाडे या ठिकाणी ही कारवाई केली. यातील ७ संशयितांपैकी काही जणांवर याआधी देखील अवैध रित्या दारू विक्री प्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
दोन्ही ट्रकमधून ही दारू पुण्यासह गुजरात, कर्नाटक, राजस्थान या ठिकाणी नेली जात असताना ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या या दोन्ही ट्रकमध्ये डांबराच्या गोळ्या पसरून ठेवल्या होत्या. जेणेकरून साठ्यातील एखादी बाटली फुटली तरी वास येउ नये.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.