Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शहरातले कोमात, ग्रामीण भागातील जोमात!

शहरातले कोमात, ग्रामीण भागातील जोमात!सांगली : खरा पंचनामा

जिल्ह्यात नवीन एक नंबर साहेब येण्याआधी जुन्या 1 नंबर साहेबांनी सगळे धंदे बंद केले होते. ते आजही बंद आहेत असा काहींचा गैरसमज झाला आहे. मात्र मुख्यालयाच्या जवळच्या शहरात सध्या तरी सर्व धंदे बंद आहेत. त्यामुळे तीन शहरात नेमून दिलेले भागवाले कोमात आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागातील भागवाले जोमात असल्याची चर्चा आहे.

जिल्ह्यातील त्या धंद्याबाबत दोन प्रतिनिधीनी उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यात पालकांनीच जाहीर उल्लेख केल्याने जुन्या 1 नंबर साहेबांनी तातडीने सगळे धंदे बंद केले. पालकांच्या मनाप्रमाणे वागूनही त्या साहेबांची बदली करण्यात आली.

त्यानंतर नवीन साहेब आले. त्यांनी त्या धंद्यावरून सर्वानाच धारेवर धरले. तोंड देखली कारवाईही करण्यास मज्जाव केला. शिवाय ज्याच्या हद्दीत धंदे सापडतील त्याला थेट मुख्यालय दाखवण्याचा दमही दिला. त्यामुळे जिल्ह्यात सध्या तरी ते धंदे बंद आहेत. मात्र ग्रामीण भागात काही ठिकाणी भागवाल्यांच्या आशीर्वादाने ते सुरू असल्याची चर्चा आहे.

सध्या मुख्यालयाच्या जवळ असलेल्या शहरांमध्ये साहेबांचा आदेश पाळून धंदे पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे शहरातील भागवाले सध्या कोमात आहेत. ग्रामीण भागात मात्र काही भागवाले 1 नंबर साहेबांसह स्वतःच्या प्रभारीला देखील फसवत आहेत असे त्यांचेच सहकारी बोलत आहेत. त्यामुळे शहरातील कोमात तर ग्रामीण भागातील काही भागवाले जोमात असल्याची चर्चा आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.