Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दरोडोखोरांच्या टोळीप्रमुखासह दोघांना अटक

दरोडोखोरांच्या टोळीप्रमुखासह दोघांना अटक ः सहा लाखाचा ऐवज जप्त



सांगली : खरा पंचनामा

सांगली एलसीबीच्या पथकाने दरोडेखोरांच्या टोळीप्रमुखासह दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १२० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. 

महेश किरास चव्हाण (वय २१, रा. कोकणगांव, अहमदनगर) आणि रोहित उर्फ सोन्या दिपक काळे (वय १९, रा. शिदा, ता. कर्जत , अहमदनगर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून सांगली जिल्ह्यातील चार गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.
जबरी चोर्‍यांबरोबरच घरफोडीच्या गुन्ह्यात वाढ होत असल्याने पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली यांनी संबधित गुन्हेगारांना त्वरीत शोधून काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक सराईत गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. या पथकाला दोन तरुण अहिल्यानगर परिसरात संशयीतरित्या घुटमळत असल्याची माहिती मिळाली. 

त्यानंतर पथकाचे प्रमुख सहाय्यक निरिक्षक संदिप शिंदे यांच्यासह इतर अंमलदार अहिल्यानगरमध्ये पोहचले. संशयीतांच्या वर्णनावरुन महेश चव्हाण आणि रोहित काळे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली. दोघेही अहमदनगर जिल्ह्यातील राहणारे असल्याने पोलिसांनी त्यांना इकडे येण्याचे कारण विचारले. परंतु ते दोघेही समाधानकारक उत्तर देवू शकले नाहीत. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. सखोल चौकशी करताना महेश याने गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडे असलेल्या दूचाकीमध्ये कटावणी आणि धारधार सुरा सापडला. त्याच्या आधारे चौकशी सुरु ठेवल्यानंतर महेश यांने सांगितले की, काही दिवसांपूर्वी विटा येथे घरात घुसून शस्त्राचा धाक दाखवून चोरी केल्याची कबुली दिली. संजयनगर, विटा, इस्लामपूर आणि तासगाव आदी चार पोलिस ठाण्यांच्या हद्दीतही गुन्हे केल्याचे त्यांनी कबूल केले आहे. 

या गुन्ह्यातील ऐवजाबाबत विचारल्यानंतर संशयीताने संबधित ऐवज सातारा येथील मित्राकडे ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळ सातारा येथे जावून तब्बल १२० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करुन आणले आहेत. चव्हाण हा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगावचा राहणारा आहे. त्याच्याविरुध्द श्रीगोंदा पोलिस ठाण्यात ६ गुन्हे दाखल आहेत तर दुसरा संशयीत रोहित काळे याच्याविरुध्द इंदापूर ( पुणे ग्रामीण) पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे, जितेंद्र जाधव, विक्रम खोत, संदीप पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.