Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

झरे येथे टँकरच्या धडकेत सातारा जिल्ह्यातील महिला ठार

झरे येथे टँकरच्या धडकेत सातारा जिल्ह्यातील महिला ठारआटपाडी : खरा पंचनामा

आटपाडी तालुक्यातील झरे येथे भरधाव टँकरच्या धडकेत सातारा जिल्ह्यातील महिला ठार झाली तर एक महिला गँभीर जखमी झाली. 
कराड - पंढरपूर रस्त्यावर झरे येथील मुख्य चौकात मंगळवारी सकाळी हा अपघात झाला.

संगीता प्रकाश पवार (वय ४५, रा. तरसवाडी, ता. खटाव, जि. सातारा) असे मृत महिलेचे नाव आहे. तर राणी सुरेश पवार (रा. झरे, ता. आटपाडी) या गंभीर जखमी झाल्या. 

झरे येथे भरधाव आलेल्या टँकर (एम एच ५० ८८८८) चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर टँकरने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. पतीची वाट पाहत रस्त्याकडेला थांबलेल्या राणी पवार यांना टँकरने उडविले. त्या गंभीर जखमी झाली. 

दरम्यान, नातलगांना भेटून प्रकाश पवार व त्यांची पत्नी संगीता घरातून बाहेर पडले. नारायण सकट व प्रकाश पवार हे दोघे बोलत होते. रस्त्याकडेला पतीची वाट पाहणाऱ्या संगीता पवार यांना टँकरने उडविले. या धडकेत त्या सुमारे १०-१५ फूट उंच उडून रस्त्यावर आपटल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातानंतर टँकर चालकाने कराड पंढरपूर रस्त्याने शेनवडी (ता. माण) च्या दिशेने पळ काढला. गावातील तरुणांनी पाठलाग करून चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.