सोलापुरातील डॉक्टरची आत्महत्या; पत्नीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा
सोलापूर : खरा पंचनामा
सोलापूर शहरातील तरुण डॉ. असद मुन्शी यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणात आत्महत्येस कारणीभूत असल्याच्या आरोपवरून मृताच्या पत्नीसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी मृत डॉ. असद मुन्शी यांचे बंधू अहमद मुन्शी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डॉ. असद मुन्शी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिट्ठी लिहिली होती. तसेच परिवाराने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी एक विडिओ देखील रेकॉर्ड केला होता.
या चिट्ठीत आणि व्हिडिओत डॉ. मुन्शी यांनी पत्नी फलकनाज नजीरअहमद सय्यद, मेहुणा डॉ. सरफराज नजीरअहमद सय्यद, सासरे नजीरअहमद सय्यद, निखत सरफराज सय्यद आणि डॉ. मिलिंद सरोदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपीनी मानसिक त्रास दिल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे डॉ. मुन्शी यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिट्ठीत आणि रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओत केले होते.
फिर्यादीवरून मृत डॉ. मुन्शी यांच्या पत्नी फलकनाज नजीरअहमद सय्यद, मेहुणा डॉ. सरफराज नजीरअहमद सय्यद, सासरे नजीरअहमद सय्यद, निखत सरफराज सय्यद आणि डॉ. मिलिंद सरोदे यांच्यावर भांदवि 306, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलाय. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पेटकर हे करीत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.