Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगली जिल्ह्यात ग्रामपंचायत निवणुकीसाठी सरासरी 80 टक्के मतदान

सांगली जिल्ह्यात ग्रामपंचायत निवणुकीसाठी सरासरी 80 टक्के मतदान



सांगली : खरा पंचनामा

सांगली जिल्ह्यात रविवारी दिवसभर ४१६ गावांमध्ये गाव कारभारी निवडण्यासाठी प्रचंड चुरशीने मतदान झाले. थेट सरपंच निवडीमुळे काट्याची टक्कर पाहायला मिळाली. त्यात उत्साह होता, धावपळ होती, जोश होता आणि धाकधूकही होतीच. जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी आज सरासरी 80 टक्के मतदान झाले.

मतपेटीत काय दडले आहे, याचा फैसला मंगळवारी (ता. २०) होणार आहे. तोपर्यंत धास्ती कायम राहणार आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे मतदान दोन टप्प्यांत होते. त्यातील हा दुसरा व सर्वांत मोठा टप्पा होता. त्यात ४४७ ग्रामपंचायतींसाठी रणांगण जाहीर झाले होते. ३१ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यानंतर ४१६ गावांत कारभारी निवडीचा आखाडा रंगला होता. 

रविवारी मतदानाचा दिवस उजाडला आणि गावागावांत एकच धावपळ बघायला मिळाली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांआधीची ही मोठी आणि महत्त्वाची ताकद दाखवण्याची प्रक्रिया असल्याने सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते अत्यंत चुरशीने कामाला लागले होते. गावची सत्ता म्हणजे ‘मिनी मंत्रालया’त जाण्याचा मार्ग सुकर, असे गणित मांडून बड्या नेत्यांनीही तेथे ठाण मांडले होते. 

प्रचारात जिल्ह्याचे, तालुक्याचे नेतेही उतरले होते. आज झालेल्या मतदान प्रक्रियेवेळी अपवाद वगळता कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. काही ठिकाणी मतदान यंत्र सुरू होण्यात अडचणी आल्या. 

पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.