सोलापुरामध्ये रेल्वेत दरोडा, प्रवाशांचे दागिने, पैसे लुटले
सोलापूर : खरा पंचनामा
सोलापुरात रेल्वे स्थानकात आलेल्या भावनगर-काकीनाडा एक्स्प्रे्समध्ये दरोडा टाकण्यात आला आहे. दरोडेखोरांनी महिला प्रवाशांचे सोने आणि रोख रक्कम लुटल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांकडून चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही घटना गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ रेल्वे स्टेशन जवळ घडली. रेल्वे गाडीतील एस-१, एस-६, एस-७ या कोचमध्ये दरोडा पडल्याची प्राथमिक माहिती आहे.
भावनगर-काकीनाडा (क्रमांक-१७२२२) ही एक्स्प्रेस १५ डिसेंबरला गुजरातच्या भावनगर येथून सायंकाळच्या सुमारास निघाली. पुण्यातील दौंडवरून सुटल्यानंतर थेट सोलापूरला या ट्रेनचा थांबा आहे. सोलापूर हद्दीतील मलिकपेठ स्टेशनच्या जवळ येताच एक्स्प्रे्सचा वेग कमी झाला. यावेळी पाळत ठेवून असलेल्या दरोडेखोरांनी गाडीचा वेग कमी झाल्याचा फायदा घेत डब्यांमध्ये प्रवेश केला.
यावेळी त्यांनी प्रवाशांना दमदाटी करत त्यांच्या अंगावरील दागिने ओरबाडून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एका महिलेच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याचे दागिने आणि ७ हजार रुपयांची रोकड, तसेच प्रवासी महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याचे दागिने, आणखी एका महिलेच्या गळ्यातील चार तोळे सोन्याचे दागिने आणि ७ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम लुटली. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफ पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.