Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अन त्याचे पोलिस भरतीचे स्वप्न राहिले अर्धवट..!

अन त्याचे पोलिस भरतीचे स्वप्न राहिले अर्धवट..!अहमदनगर : खरा पंचनामा

भरधाव वाहनाच्या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट ते वाळकी रस्त्यावर बुधवारी सकाळी ही घटना घडली. योगेश बबन पंचमुख (वय 20, रा. बाबुर्डी घुमट, ता. नगर) असे मृताचे नाव आहे. तो पोलिस आणि लष्कराच्या भरतीसाठी सराव करत होता या अपघाताने त्याचे भरतीचे स्वप्न अर्धवट राहिल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

योगेश न्यू आर्ट्स महाविद्यालयात पदवीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. बाबुर्डी घुमट गावातील महाविद्यालयीन शिक्षण घेणारे काही तरुण सध्या पोलिस व लष्कर भरतीसाठी तयारी करीत आहेत. त्यामुळे दररोज पहाटे ते धावण्याच्या सरावासाठी बाबुर्डी ते वाळकी रस्त्यावर जात असतात. बुधवारी पहाटे योगेश आपल्या दोन मित्रांसह सरावासाठी गेला होता. बाबुर्डी गावापासून वाळकीकडे जाणा़र्‍या रस्त्यावर ते विश्रांतीसाठी बसले होते. त्याचवेळी नगरहून वाळकीकडे जाणा़र्‍या भरधाव वाहनाने योगेशला जोराची धडक दिली. 

यामध्ये त्याच्या डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर वाहनचालक तेथे न थांबता वाहनासह पसार झाला. जखमी योगेशला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.