आयपीएस अधिकार्यावर आरोपाची पत्रे; गुन्हा दाखल
पुणे : खरा पंचनामा
एका आयपीएस अधिकाऱ्याकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप पत्राद्वारे करण्यात आला आहे. खात्यातील निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्या नावाने पत्र लिहून बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत चौकशी केल्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका आयपीएस अधिकाऱ्यांना त्रास देण्याच्या हेतूने कोणीतरी आयुक्त व अन्य वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्यांना पत्रे लिहिली होती. त्यात एका निरीक्षक, सहायक निरीक्षक, २ उपनिरीक्षक व एका महिला उपनिरीक्षकांच्या नावे अशी एकूण ५ वेगवेगळी पत्रे पाठविण्यात आली आहे. ३ ऑक्टोबर रोजी ही पत्र पाठविण्यात आली होती.
त्यामध्ये त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आम्हाला त्रास दिला जात असल्याचे म्हटले होते. ही पत्र मिळाल्यानंतर आयुक्तांनी या पत्राखाली सह्या असणार्या या अधिकार्यांकडे चौकशी केली.
त्यात संबंधित अधिकार्यांनी आम्ही ही पत्र लिहिली नसल्याचे सांगून चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार चौकशी केल्यानंतर त्यांच्या खोट्या सह्या करुन त्यांच्या नावाचा गैरवापर करुन त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदनामी व्हावी व बदली व्हावी, या हेतूने ही पत्र लिहिली असल्याचे आढळून आले$. त्यानंतर आता कट करुन बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.