Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दोन लाखांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात

दोन लाखांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात



नागपुर :  खरा पंचनामा

फसवणुकीच्या गुन्ह्यात पत्नीचे नाव न घेण्यासाठी आणि प्रॉपर्टी सिज न करण्यासाठी पाच लाख रुपये लाच मागून 2 लाख रुपये लाच घेताना  आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षकाला नागपूर एसीबीच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले.

विवेक लोणकर (वय 57, रा. वर्धा) असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. नागपूर एसीबीच्या पथकाने ही कारवाई याबाबत बलोदे ले आऊट अकोला येथील 34 वर्षीय व्यक्तीने नागपूर एसीबीकडे तक्रार दिली आहे. 

तक्रारदार यांच्यावर हिंगनघाट पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तक्रारदार यांना न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर झाला असल्याने ते विवेक लोणकर यांच्याकडे हजेरीसाठी येत होते. विवेक लोणकर यांनी तक्रारदार यांचा बेल रद्द न करण्यासाठी, त्यांची प्रॉपर्टी सीज न करण्यासाठी आणि त्यांच्या पत्नीचे नाव गुन्ह्यात न टाकण्यासाठी पाच लाख रुपये लाच मागितली. तडजोडीअंती दोन लाख रुपये देण्याचे ठरले होते. 

तक्रारदार यांनी नागपूर एसीबीकडे तक्रार केली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी पडताळणी केली असता लोणकर यांनी पाच लाख रुपये लाच
मागून तडजोडीअंती दोन लाख घेण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून दोन लाख रुपये लाच घेताना विवेक लोणकर यांना रंगेहात पकडले. त्यांच्यावर वर्धा शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.