Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीतुन दत्त भक्तांची वारी, अन कोल्हापूर रस्त्यावरील बारमध्ये मध्यरात्री दारूचे पार्सल

सांगलीतुन दत्त भक्तांची वारी, अन कोल्हापूर रस्त्यावरील बारमध्ये मध्यरात्री दारूचे पार्सल

सांगली : खरा पंचनामा

बुधवारी श्री दत्त जयंती साजरी केली जात आहे. त्यानिमित्ताने श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दर्शनासाठी भाविक आज रात्रीपासून पायी नृसिंहवाडीकडे निघाले आहेत. पूर्ण सांगली-कोल्हापूर रस्ता भाविकांनी भरून गेला आहे. मोठया भक्तिभावाने सांगलीकर नृसिंहवाडीकडे निघाले आहेत. भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. मात्र अशा भक्तिमय वातावरणात देखील संगलीतील या रस्त्यावरील बिअर बारमध्ये दारूचे पार्सल दिले जात असल्याची तक्रार भाविक करत आहेत. पार्सल घेण्यासाठी आलेल्या तळीरामांचा त्रास भाविकांना होत आहे. 

भाविकांमध्ये युवक, युवती, महिलांचाही मोठा समावेश आहे. मध्यरात्र झाली तरी रस्त्यावरील बारमध्ये दारूचे पार्सल कसे मिळत आहे असा प्रश्न भविकांमधून विचारला जात आहे. सांगली कोल्हापूर रस्त्यावरील ठराविक बारलाच अशी परवानगी आहे का असाही प्रश्न भाविक उपस्थित करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.