Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सीमाभागातील महामार्गांवरील बंदोबस्तात वाढ

सीमाभागातील महामार्गांवरील बंदोबस्तात वाढ



मुंबई : खरा पंचनामा

 मंगळवारी (६ डिसेंबर) सकाळी महाराष्ट्राच्या वाहनांवर कर्नाटकमधील बेळगाव येथील हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ दगडफेक करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील गाड्यांवर हल्लाबोल करत कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक करून सहा गाड्याच्या काचा फोडल्या. या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य पोलिस दलाचे कायदा व सुव्यवस्था प्रमुख मिलिंद भारंबे यांनी सीमामार्ग सहित राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस आयुक्त आणि पोलिस अधिक्षकांना बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.