Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'त्यांना' तपासाच्या शेवटी बाजूला करतात!

'त्यांना' तपासाच्या शेवटी बाजूला करतात!



सांगली : खरा पंचनामा

सांगली जिल्ह्यात अनेक गुन्ह्यांचा तपास केला जातो. एक विशेष शाखा याचा तपास करते असे वाटते. पण या शाखेतील वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेले जुने जाणते  लोक मात्र कोणतही काम न करता नवीन पोरांकडून काम करून घेतात. यासाठी एक अधिकारी (बकरा) शोधून तपास अंतिम टप्प्यात आल्यावर नवीन पोरांना बाजूला सारून स्वतः क्रेडिट घेतात. याची एक नंबर साहेब दखल घेणार  का असा प्रश्न त्या पोरांकडून विचारला जात आहे.

या शाखेत तेच तेच जुने लोक आणून त्यांना प्रसंगी आर्थिक पाठबळ देऊन गुन्हा उघड केला असे चित्र तयार केले जाते आहे. असे चित्र निर्माण करणाऱ्यांनी याआधी फक्त डीबीत काम केलेले आहे. राजकीय वशिला आणि अधिकाऱ्यांचे पाठबळ यावर ठराविक लोकांनी फक्त त्या विशेष शाखेत काम केले आहे. अनेकदा तर प्रतिनियुक्तीवरही काम केले आहे.

यामध्ये काम करूनही नवीन पोरांचे हाल होत आहे.
ही शाखा अनेक क्लिष्ट गुन्ह्यांचा तपास करते. कर्तृत्व सिध्द करण्यासाठी या शाखेतील नवीन पोरं जीव तोडून मेहनत करतात पण हे सिनियर बकरा अधिकाऱ्याला हाताशी धरून त्यांना ऐनवेळी बाजूला करतात.

बातमीत मात्र त्या शाखेत तसेच मुख्यालयातील तत्कालीन विशिष्ट शाखेतून आलेल्यांची नावे दिली जातात. पदरमोड करून, क्लिष्ट तपास करूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शाबासकी मिळू शकत नसल्याने ती पोरं तोंड दाबून बुक्यांचा मार खात आहेत. नवीन साहेबांनी फक्त शाबासकी द्यावी यासाठीच ती पोरं अन्याय सहन करत आहेत.
नवीन साहेब न्याय देतील अशी त्यांना अपेक्षा आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.